ST Workers Strike : राज्यातील संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. कामगार न्यायालयाने बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढच झाली आहे. ST Workers Strike Labor court slams ST workers By Refusal to adjourn the proceedings
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे. कामगार न्यायालयाने बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढच झाली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तेव्हापासून काही एसटी कर्मचारी कामावर गैरहजर राहिले. परिवहन खात्याने अनेक वेळा सूचना देऊनही एसटी कर्मचाऱ्यांनी न ऐकल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत 10,000 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. संपात सहभागी अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसाही देण्यात आल्या.
एसटी महामंडळाने एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या कारवाईविरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर आणि यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित 9 कर्मचाऱ्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.
ST Workers Strike Labor court slams ST workers By Refusal to adjourn the proceedings
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App