विधीभवनाच्या बाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न ; पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात

पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे आणि आमच्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप करत त्या महिलेने केले.Attempted self-immolation of a woman outside the Vidhi Bhavan; The situation was brought under control by the police


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन मुंबई येथे सुरु असून आजचा अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान विधिभवनासमोर आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
आज विधिभवनात आत अधिवेशन सुरु असतानाच विधीभवनाच्या बाहेर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयात्न केला.त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.



दरम्यान पोलिसांनी परिस्थिती व्यावास्थित पद्धतीने हाताळल्याने परिस्थती नियंत्रणात आली.आत्मदहनाचा प्रयत्न करणारी महिला ही नाशिकची आहे. ती महिला नाशिकहून मुंबईला आली होती.पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे आणि आमच्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप करत त्या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

यावेळी सदर महिलेने मला सोडा, जाऊ द्या. मी इथे न्याय मागण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला सहकार्य करते, मला प्रसारमाध्यमांशी बोलून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या महिलेला ताब्यात घेतलं.

Attempted self-immolation of a woman outside the Vidhi Bhavan; The situation was brought under control by the police

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात