अबब….दुबईच्या राजाला पत्नीला द्यावी लागणार साडेपाच हजार कोटी रुपयांची पोटगी

विशेष प्रतिनिधी

लंडन : दुबईच्या राजाला आपल्या पत्नीला तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. आजपर्यंतच्या सर्वात महागड्या घटस्फोटापैकी हा एक आहे.ब्रिटीश न्यायालयाने मंगळवारी दुबईच्या राजाला ब्रिटीश इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एकावर निर्णय दिला.The king of Dubai will have to pay alimony of five and a half thousand crore rupees to his wife

त्याच्या माजी पत्नी आणि त्यांच्या मुलांना 550 दशलक्ष पौंड म्हणजे साडेपाच हजार कोटी रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने म्हटले आहे की शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी त्यांची सहावी पत्नी राजकुमारी हया बिंत अल हुसेन यांना 251.5 दशलक्ष पौंड द्यावेत आणि त्यांच्या मुलांसाठी 290 दशलक्ष पौंड देण्याचे आदेश दिले आहेत.



त्यांची 14 वर्षीय अल जलीला आणि 9 वर्षीय झायेद अशी मुले आहेत. यामध्ये त्यांच्या सुरक्षेचा खर्चही समाविष्ठ आहे. कारण त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

47 वर्षीय हया 2019 मध्ये इंग्लंडला पळून आल्या होत्या. त्यांनी ब्रिटीश न्यायालयाकडे दोन मुलांचा ताबा मागितला. जॉर्डनचे दिवंगत किंग हुसेन यांची मुलगी असलेल्या राजकुमारी ह्या म्हणाल्या की त्यांनापतीची भीती वाटते. ते जबरदस्तीने आपल्या दोन्ही मुलांना दुबईला घेऊन जातील.

शेख मोहम्मद हे 72 वर्षीय असून हे संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान आहेत. राणी एलिझाबेथ यांचा मित्र आहेत. ते एक घोडेमालकही आहेत. ह्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीधर असून एक उत्कृष्ठ अश्वारोहक आहेत. 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये जॉर्डनसाठी शो जंपिंगमध्ये भाग घेतला होता.

न्यायाधीश अँर्ड्यू मॅकफार्लेन म्हणाले की, इस्रायलच्या एनएसओ ग्रुपने निर्मित पेगासस स्पायवेअर वापरून राजकुमारी आणि तिच्या वकिलांचे फोन हॅक करण्यासाठी शेख यांनी आदेश दिले होते. हे सॉफ्टवेअर केवळ देशांना त्यांच्या सुरक्षा सेवांद्वारे वापरण्यासाठी परवानाकृत आहे.

The king of Dubai will have to pay alimony of five and a half thousand crore rupees to his wife

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात