विशेष प्रतिनिधी
शिरोळ : दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषामध्ये शनिवारी नरसोबावाडी दुमदुमली. दत्त जयंतीचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. Digambara Digambara… Shripad Vallabh Digambara… Datta Jayanti celebration in Narasobawadi
दत्त पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिर परिसरामध्ये भाविकांनी कळसाचे दर्शन घेतले. मंदिरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली.
काकड आरती भजन कीर्तनाने वातावरण मंगलमय झाले. दत्त मंदिर आकर्षक फुलांनी सजविले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागातून दत्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. कोल्हापूर प्रशासनाकडून व दत्त देवस्थान समितीकडून बंदोबस्त ठेवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी झाली नव्हती. पण यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून दत्त जयंती उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App