‘निक जोनासची पत्नी’ असे संबोधलेल्या एका वृत्तपत्राला प्रियांका चोप्राने चांगलेच खडसावले

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमधील एक सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. हॉलीवूडमध्ये देखील ती बऱ्याच सिनेमांमध्ये आणि सीरिजमध्ये झळकली आहे. ती एक इंटरनॅशनल सिंगर आहे. बिझनेस वुमन आहे. मिस वर्ल्ड आहे. या सर्व गोष्टींमुळे तिने आपले एक वेगळे स्थान आणि वेगळी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Priyanka Chopra slams a newspaper for mentioning her Wife of nick johan

द मॅट्रिक्स रिसरेक्शनची या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रियांका सध्या बिझी आहे. या प्रमोशनच्या वेळी डेली मेल या वृत्तपत्राने प्रियांकाचा एका आर्टिकलमध्ये उल्लेख ‘निक जोनासची पत्नी’ असा केला आहे. प्रियांकाने या गोष्टीचा विरोध करत आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर या वृत्तपत्राला चांगलेच खडसावले आहे. निक जोनस आणि प्रियांका चोप्रा 2018 मध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर तिने बऱ्याच हॉलीवूड सिनेमांमध्ये आणि प्रोजेक्ट्समध्ये काम केलेले आहे.


‘पीएम मोदी, प्रियांका चोप्राने बिहारमध्ये घेतली लस!’ डेटा ऑपरेटरचा प्रताप, उघडकीस येताच कामावरून हटवले


आपल्या या स्टोरीमध्ये प्रियांका म्हणते की, मी जगातल्या सर्वात जास्त आयकॉनिक सिनेमाचे सध्या प्रमोशन करत आहे आणि माझा उल्लेख आजही निक जोनासची पत्नी म्हणून केला जातो. आजही स्त्रियांना असे का संबोधले जाते? हा प्रश्न तिने आपल्या स्टोरीमध्ये विचारला आहे. तसेच ती म्हणते की, मला माझे काम सिद्ध करण्यासाठी IDMB लिंक इथे पोस्ट करावी लागेल का?

स्रीया कितीही यशस्वी झाल्या, स्वतःचं नाव त्यांनी स्वत:च्या हिमतीवर, कष्टाने, कर्तृत्वावर मोठं केले असले तरीसुद्धा ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी पत्नी आहे असे म्हणून संबोधले जाते. जेव्हा की पुरुषाला त्याचे स्वतंत्र अस्तित्व अगदी सहज आणि नैसर्गिक हक्क असल्या सारखे मान्य केले जाते. प्रयत्न, कष्ट स्त्रीचे आणि पुरुषाचे सारखे असतील, मिळालेले यश ही सारखे असेल किंवा एखाद्या स्त्रीने पुरुषापेक्षा अधिक यश मिळवले असेल तरीही तिला कोणत्या नात्याने ला संबोधले जाते? तिचे स्वतंत्र अस्तित्व सहजपणे का स्वीकारले जात नाही? या गोष्टीला प्रियांकाने विरोध केला आहे.

Priyanka Chopra slams a newspaper for mentioning her Wife of nick johan

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात