मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने आरोग्य विभागासोबतच इतर सर्व विभागातील निलंबीत कर्चाऱ्यांचंही निलंबन रद्द करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.Mumbai Municipal Corporation re-hired 117 employees
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने लाचखोरी प्रकरणात तसंच गैरकारभार, बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत 117 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. पण कोवीड ड्युटीच्या नावाखाली मे 2021 मध्ये या सर्वांना कामावर परत घेण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे कमला मील आग दुर्घटना प्रकारणाती 2 दोषी निलंबित अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.कोविड संकटावेळी मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याने आरोग्य विभागासोबतच इतर सर्व विभागातील निलंबीत कर्चाऱ्यांचंही निलंबन रद्द करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
यात आरोग्य विभागातून 17 तर तीन वेगवेगळ्या रुग्णालयातील 6 जणांना परत कामावर घेतलं गेलं आहे. घनकचरा विभागातून 53, मुख्य अभियंता विभागातून 23, पाणी, सुरक्षा आणि अग्निशामक विभागातून प्रत्येकी 6 निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत रुजु करुन घेण्यात आलं आहे. जितेंद्र घाटगे यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती मिळवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App