विशेष प्रतिनिधी
मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या परीक्षांच्या तारखा अखेर समोर आलेल्या आहेत. बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. ही लेखी परीक्षेची तारीख आहे. तसेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या काळामध्ये होणार आहे.
SSC-HSC: Finally the dates of 10th and 12th examinations have been announced
परीक्षेसंदर्भात माहिती देताना वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ओमिक्रॉन संदर्भातील तपशिलाचा आम्ही वारंवार अभ्यास करत आहोत. दहावी आणि बारावी चे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते, याची आम्हाला जाणीव आहे.
Mhada Exam Update : म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलली ;आता या महिन्यात होणार परिक्षा
दहावीच्या मुलांची तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चमध्ये होणार आहे.
पुढे त्यांनी असे देखील सांगितले की, परीक्षा या नेहमीच्या पद्धतीनेच घेतल्या जातील. ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहेत. परीक्षा पद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App