यावेळी देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे विविध नेत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.Union Home Minister Amit Shah on a two-day visit to Shirdi, Pune
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रात सहकार परिषदेनिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येणार आहेत. अमित शाह या परिषदेत सहकार संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा का याकडे सर्वांचे लक्ष आहे.अमित शाह दोन दिवस शिर्डी, पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान शरद पवार यांना मात्र अजूनही राज्यातील सहकार परिषदेचं अद्याप निमंत्रण नाही
18 डिसेंबरला शाह शिर्डीत येणार आहेत. यावेळी ते साईबाबांचे दर्शन ते घेतील. त्यानंतर पहिल्या सहकार परिषदेला ते उपस्थित राहतील. यावेळी देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे विविध नेत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी सहकार परिषदेचे आयोजन केले आहे.
अमित शाह हे 19 डिसेंबरला पुणे दौरा करण्याची शक्यता आहे. त्यात पुण्यातील विकासकामांचं उद्घाटन ते करतील. त्यानंतर ते मेळावा घेण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शाहांच्या या राजकीय दौऱ्याकडे पाहिलं जात आहे.राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराची राजकीय वर्तुळात चर्चा असताना शाह राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुणे महापालिका निवडणूक पाहता शाह यांचा राजकीय दौरा नेमका कसा असणार याविषयी उत्सुकता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App