पृथ्वीपासूऩ अधिक उंचीवर त्याचप्रमाणे खोल समुद्रात अन्य जीवसृष्टी अस्तित्वात राहण्याची शक्यता कमी असते. कारण जसजसे तुम्ही अधिक वर जाता तसतसे हवेतील आक्सीजनचे प्रमाण कमी होवू लागते. त्याचप्रमाणे खोल समुद्रात आक्सीजन तर कमी असतोच त्याशिवाय पाण्याचा दाबदेखील तेथे खूप कमी असतो. त्यामुळे तेथे प्राणी जगण्याची शक्यता खूप कमी होवी लागते.How deep can fish live in the ocean?
त्यामुळेचे तेथे जीवसृष्टी नसल्याचे मानले जाते. मात्र या शक्यतांना छेद देणाऱ्या अनेक गोष्टी जेव्हा आढळतात त्यावेळी आपण आश्चर्यचकित होतो. अशीच एक घटना न्यूझीलंडमध्ये घडली आहे. तेथे खोल समुद्रात जवळपास सात किलोमीटर खोलीवर मासे आढळले आहेत. त्यामुळे समुद्री जीवांचा अभ्यास करणारे तज्ञ थक्क झाले आहेत. आता त्यांनी हे मासे तेथे कसे काय जगतात याचा कुतूहलाने सखोल अभ्यास सुरु केला आहे.
या माशांचे गूढ उलगडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. अमेरिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी संयुक्त अभ्यास सुरु केला आहे. समुद्रात तब्बल सात किलोमीटर खोल अंतरावर स्नेलफिश आढळला. समुद्रात खोलवर पाण्याचा दाब मोठय़ा प्रमाणावर असतो. या दाबाचा हे मासे सामना कसा काय करू शकतात असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे. कारण सर्वसाधारणपणे अंदाजे सहा ते आठ किलोमीटर खोलीपर्यंत मासे जगू शकत नाहीत.
जगातील सर्व महासागरातील मासे खोलवर राहत नाहीत. कारण तेथे ते जगू शकत नाहीत. अत्यंत काळ्याकुट्ट अंधारात हा स्नेलफिश हा मासा कसा जगतो याचा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला. गेल्या साठ वर्षात स्नेलफिश हा मासा दिसलेला नव्हता. तो केवळ पुस्तकातच होता. संशोधनासाठी न्यूझीलंडजवळच्या केरमॅडेक गर्तेत बॉक्सच्या आकाराचे यंत्र सोडले. माशांना आकर्षित करण्यासाठी भक्ष्य सोडले. तेव्हा स्नेलफिशचा शोध लागला. ही गोष्ट अत्यंत आश्चर्यकारक होती.
सन 1970 मध्ये मध्ये चिलीजवळच्या समुद्रात आठ किलोमीटर खोलीवर कस्क इल हा मासा सापडला होता. त्यानंतर स्नेलफिश हा मासा सात किलोमीटरवर सापडला आहे. त्यामुळी समुद्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच त्यांना या स्नेलफिशने आऴ्हानदेखील निर्माण केले आहे.
How deep can fish live in the ocean?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App