विशेष प्रतिनिधी
जलपायगुडी : मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मुस्लिम समाजाने मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.The Muslim community has decided to turn off loudspeakers in the mosque so as not to disrupt children’s studies
मुलांना शिक्षण घेताना अजानमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. शिवाय, मशिदीने मुलांच्या शिक्षणासाठी जागा देखील दिली आहे. मुस्लिम समाजातील लोकांच्या या कामाचे सर्वजण कौतुक करत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी हा खूप स्तुत्य निर्णय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
मशीद प्रशासनाने आम्हाला चांगले सहकार्य केल्याचे मशिदीजवळील शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी सांगितले. करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मशिदीमध्ये अजान आणि नमाजसाठी लाऊडस्पीकर न वापरण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे साहा म्हणाले.
लाऊडस्पीकरवर अजानच्या आणि नमाजच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार आत्तापर्यंत अनेकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीच्या इमामाने लाऊडस्पीकरवर नमाज पठण करण्याबाबत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App