सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन झाले आहे. कोरोनावरील लस कोव्हिशील्ड बनवण्यात डॉ. जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. ७२ वर्षीय जाधव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. आज बुधवारी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात त्यांचे निधन झाले.Serum Institutes dr Suresh Jadhav Passed Away, played an important role in the production of Covishield Vaccine on Corona
वृत्तसंस्था
पुणे : सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन झाले आहे. कोरोनावरील लस कोव्हिशील्ड बनवण्यात डॉ. जाधव यांचा मोलाचा वाटा आहे. ७२ वर्षीय जाधव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. आज बुधवारी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
Suresh Jadhav was a stalwart of vaccine manufacturing in India. He built the technical capabilities of @SerumInstIndia from the ground up. His humility & down-to-earth style always impressed me. His passing away is a sad day for all in the vaccine industry, especially the DCVMN. pic.twitter.com/G9ezwwLxTM — Prashant Yadav (@Prof_Yadav_SCM) December 8, 2021
Suresh Jadhav was a stalwart of vaccine manufacturing in India. He built the technical capabilities of @SerumInstIndia from the ground up. His humility & down-to-earth style always impressed me. His passing away is a sad day for all in the vaccine industry, especially the DCVMN. pic.twitter.com/G9ezwwLxTM
— Prashant Yadav (@Prof_Yadav_SCM) December 8, 2021
पुण्यातल्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून पदवी घेतली. डॉ.जाधव यांनी जागतिक पटलावर आपला ठसा उमटवला होता. जगभरात त्यांच्या नावे अनेक पेटंट्स आहेत.
डॉ. जाधव यांना लस संशोधनाचा ४० वर्षांचा अनुभव होता. डॉ. सुरेश जाधव यांच्या निधनावर औषधनिर्माण क्षेत्राने शोक व्यक्त केला आहे. डॉ. जाधव यांच्या जाण्याने भारतीय वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश जाधव यांच्या निधनाबद्दल हॉवर्ड स्कॉलर प्रशांत यादव यांनी ट्विट केले, “सुरेश जाधव यांनी भारतातील लस निर्मितीमध्ये एक भक्कम भूमिका बजावली. त्यांनी तांत्रिक क्षमता घेतली. त्यांची नम्रता आणि शैलीने नेहमीच प्रभावित केले आहे. त्यांचे निधन संपूर्ण लस उद्योगासाठी विशेषतः DCVMN साठी दुःखद आहे.”
जानेवारी 2021 मध्ये एका मुलाखतीत ते म्हणाले, “एक वर्षापेक्षा कमी कालावधीत लस बनवणे ही सोपी गोष्ट नाही. कोरोनाने लस संशोधनात जागतिक सहकार्याला चालना दिली आहे. ही लस अतिशय वेगाने विकसित केली गेली आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सरकार आणि अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत लस वापरण्यास परवानगी देत आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App