अंकिता विकीचा लग्नसोहळा या महिन्यात 12 ते 14 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. Ankita Vicky’s Wedding Ceremony, Wedding Invitation to Governor Bhagat Singh Koshyari
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या बॉलिवूड मध्ये लगीन सराई सुरू आहे. विकी-कतरिनाच्या लग्ना बरोबरच आता पवित्र रिश्ता 2 मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या अंकिता लोखंडेने देखील लग्नाची गुड न्यूज दिली आहे. तसेच रणबीर कपूर आणि आलीया भट्ट हे दोघं देखील लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
पवित्र रिश्ता 2 ही मालिका सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती आणि अजूनही करत आहे. या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अंकिता लोखंडेची आता तिचा बॉयफ्रेंड विकी जैन सोबत विवाहबद्ध होणार आहे. अंकिता विकीचा लग्नसोहळा या महिन्यात 12 ते 14 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
यावेळी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत.या दोघांनी त्यांच्या लग्नाचं निमंत्रण सेलिब्रेटींना देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान यावेळी त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना दिलेल्या निमंत्रणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री अंकिता आणि विकीनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं. राज्यपालांना निमंत्रण दिल्यानंतर अंकितानं आनंद व्यक्त केला आहे.यावेळी आपलं निमंत्रण राज्यपालांनी स्वीकारलं ही मोठी बाब असल्याचे तिनं सांगितलं आहे.हे दोघं डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच लग्न करणार आहेत.गेल्या काही दिवसांपासून विकी आणि अंकिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यांना चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App