वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सोमवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. देशभरात रुग्णांची संख्या २४ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने सांगितले की, राज्यातील एका ३७ वर्षीय व्यक्तीमध्ये या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. तो २५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून परतला होता. 10 patients of Omicron in the state; 24 infected in the country
अमेरिकेतून परतलेल्या ३६ वर्षीय महिलेमध्ये दुसऱ्या प्रकरणाची पुष्टी झाली आहे. हे दोघे मित्र आहेत. मात्र, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. फायझरची लस घेतल्यानंतरही दोघांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे. दोघांवर मुंबईतील ७ हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही ओळख पटली आहे.
रविवारी पुण्यातील एका व्यक्तीला ओमिक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्याचा नमुना पुन्हा जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. केंद्र सरकारच्या म्हण्यानुसार, ओमिक्रॉनच एकूण रुग्ण हे २३ आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App