निष्पापांच्या बळीनंतर नागालँडमध्ये धुमसू लागला असंतोष, विविध संघटनांकडून बंदचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

कोहिमा – सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारामध्ये तेरा निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर नागालँडमध्ये असंतोष धुमसू लागला आहे. पोलिसांनी लष्कराच्या २१ व्या पॅरा स्पेशल फोर्सविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून लष्कराने देखील या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.Tense atmosphere in Nagaland

दरम्यान लष्कराच्या गोळीबारामध्ये नेमके किती लोक मरण पावले याबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे. आदिवासींच्या कोनयाक युनियनने दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारामध्ये सतराजण ठार झाल्याचा दावा करण्यात आला होती पण नंतर हा आकडा १४ करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी मात्र या गोळीबारामध्ये चौदाजण ठार झाल्याचा दावा केला आहे.



या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी विविध आदिवासी संघटना, नागरी हक्क आणि विद्यार्थी संघटना यांनी सोमवारी बंदचे आवाहन केले होते. या भागातील सर्वांत प्रभावशाली संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागा स्टुडंट फेडरेशनने (एनएसएफ) पाच दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

स्थानिकांनी या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करण्यात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या गोळीबारामध्ये २८ जण जखमी झाले असून अन्य सहा गंभीर जखमींवर सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

Tense atmosphere in Nagaland

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात