विकी आणि कतरिनाच्या विवाहाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. हा विवाह सोहळा वैदिक पद्धतीने होणार आहे.Dad! Katrina – As many as ४० pundits will attend Vicky’s royal ceremony
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचं लग्ना आता काही दिवसांवर आलं आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूरमधील सिक्सस्थ सेन्स फोर्टमध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. सवाई माधोपूर येथे ७ डिसेंबरला संगीत, त्यानंतर ८ डिसेंबरला मेहंदी आणि ९ डिसेंबरला विवाहसोहळा होईल. त्यानंतर १० डिसेंबरला रिसेप्शन होईल.
या विवाह समारंभासाठी मुंबईमधून एक खास तंबू आला आहे.हा हॉटेलच्या आवारामध्ये हा तंबू लावला जाणार आहे.विकी आणि कतरिनाच्या विवाहाचे सर्व धार्मिक विधी होणार आहेत. हा विवाह सोहळा वैदिक पद्धतीने होणार आहे.दरम्यान विवाह समारंभासाठी ४० पंडीत येणार आहेत. सिक्स्थ सेन्स फोर्टशिवाय आणखीन ३ हॉटेलांचेही बुकिंग करण्यात आले आहे.
तसंच कोविडचा काळ लक्षात घेऊन या लग्नाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का याची खातरजमा करून घेण्याचे आदेशही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.कतरिना – विकीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी एक सिक्रेट कोड दिला जाणार आहे.जे पाहुणे कॅट-विकीच्या लग्नात सहभागी होणार आहेत त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने प्रवेश मिळणार नाही तर एका विशेष कोडद्वारे त्यांना प्रवेश मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App