विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रस्ते अपघातांचे शहर ठरली आहे. चालू वर्षातील पहिल्या १० महिन्यांत राज्यातील सर्वाधिक अर्थात, १६६० रस्ते अपघात मुंबईत झाले आहेत. या अपघातांत २२७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४४२ प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र सर्वाधिक अपघात होत असतानादेखील अपघाती मृत्यूचा दर घटत आहे.
उखडलेले गतिरोधक, रस्त्यांवरील खड्डे, दिशादर्शकांचा अभाव यामुळे रस्ते अपघातांना आमंत्रण मिळते. तसेच वाहतूक नियमांचे पालन न करणे, बेशिस्तपणे वाहन चालवणे, पदपथांवर अतिक्रमण हेदेखील रस्ते अपघातासाठी कारणीभूत ठरते.
मुंबईत २०१९मध्ये ३५८ अपघाती मृत्यू झाले होते. तर, गेल्या वर्षी २६६ अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. परिवहन आयुक्त व महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
रस्त्यांचे २७ हजार कोटी खिशात ओतून दाखवले!#मुंबईला अपघातात क्रमांक १ करून दाखवले! वेळेच्याआधी पोहचवून दाखवले!@mybmc @mumbaimatterz @ShivSena @BJP4Mumbai pic.twitter.com/QVUC72pB8j — nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) December 5, 2021
रस्त्यांचे २७ हजार कोटी खिशात ओतून दाखवले!#मुंबईला अपघातात क्रमांक १ करून दाखवले! वेळेच्याआधी पोहचवून दाखवले!@mybmc @mumbaimatterz @ShivSena @BJP4Mumbai pic.twitter.com/QVUC72pB8j
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) December 5, 2021
याचपार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. रस्त्यांचे २७ हजार कोटी खिशात ओतून दाखवले अन् मुंबईला अपघातात क्रमांक १ करून दाखवले, असं म्हणत वेळेच्याआधी पोहचवून दाखवले, असा टोला देखील नितेश राणे यांनी लगावला आहे.
राज्यात ऑक्टोबरअखेरीस २३,६२१ अपघातांची नोंद झाली असून यात २९,०३४ प्रवासी अपघातग्रस्त झाले. यात १० हजारांहून जण मृत्युमुखी पडले. तर, जखमींची संख्या १८ हजारांहून अधिक आहे. यानुसार रोज सरासरी ९६ नागरिक अपघातग्रस्त होत आहेत.
करोनानंतर सार्वजनिक वाहतुकीच्या तुलनेत दुचाकी-चारचाकीचा वापर वाढला. अन्य पर्याय नसणारे प्रवासीच सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करतात. रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाल्याने शहरातील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मेट्रो शक्य तितक्या लवकर सुरू झाल्यास अपघातांमध्ये घट होण्याची शक्यता आहे, असे मत रस्ते वाहतूकतज्ज्ञ विवेक पै यांनी व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App