विशेष प्रतिनिधी
मुबंई : दिसतं तसं नसतं असे म्हणतात हे खरंच आहे. फिल्म इंडस्ट्री, अॅक्टींग करिअर कितीही लॅव्हिश मनमोहक दिसत असेल तरी तिथला कास्टिंग काऊच हा प्रकार तितकाच भयंकर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. बऱ्याच नवोदित अभिनेत्रींना, स्ट्रगलर अभिनेत्रींनी, अभिनेत्यांनी वेळोवेळी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत मिडीयामध्ये येऊन माहिती दिली हाेती. कास्टिंग काऊच हा प्रकार इंडस्ट्रीमध्ये असतोच, असे गृहीत धरून बऱ्याच कलाकारांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्याचा विचारदेखील सोडला असेल, इतकं याचं हे भयंकर रूप आहे.
Casting Couch: Newcomer actress lodges complaint in police station over demand of sexual favors from producers brother
नुकताच एका स्ट्रगलर अभिनेत्रीने आरे पोलिस स्टेशनमध्ये एका फिल्म प्रोड्यूसरच्या भावाविरूध्द तक्रार दाखल केली आहे. या प्रोड्यूसरच्या भावाने तिच्याकडून सेक्शुअल फेव्हरसची मागणी केली होती असा ह्या अभिनेत्रीने आरोप केला आहे. सेक्शन 354 आयपीसी द्वारे त्या 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. सुत्रांकडून अशी माहिती मिळते की या व्यक्तीचे नाव स्वप्नील लोखंडे असे आहे.
अल्पवयीनच्या त्वचेला स्पर्श केला नाही तर लैंगिक हेतू महत्वाचा, लैंगिक अत्याचारच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट
मराठी सीरियल सहकुटुंब सहपरिवार सध्या अतिशय चर्चेचा विषय बनली आहे. या मालिकेतील अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी नुकताच मालिकेच्या प्रॉडक्शन टीमवर आरोप केला होता की मला बऱ्याच वेळी टॉर्चर केले गेले आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले होते. तर याच मालिकेतील अभिनेत्री स्वाती बाघवे हिने नुकतीच स्वप्नील लोखंडे (प्रोडक्शन कंट्रोलर) याच्याविरूद्ध सेक्शुअल फेव्हरसची मागणी केल्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
स्वातीने क्राईम पेट्रोल मध्ये काम केले आहे. सहकुटुंब सहपरिवार मध्ये ती बॉडी डबल म्हणून काम करते. तिने स्वप्नील लोखंडे याच्याविरूद्ध गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App