पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्या १६ वर्षांच्या शाळकरी मुलाला निओल चेक पोस्ट येथून अटक करण्यात आली.Gujarat: A 16-year-old schoolboy is smuggling drugs for only five rupees
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : ड्रग्जमाफिया अवैध धंद्यांसाठी,तसेच ड्रग्ज व अफीमच्या तस्करीसाठी शाळकरी मुलांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. याचच उदाहरण म्हणजे शाळेत शिकणाऱ्या एका मुलाला अफीमची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत वॉटर बॉटलमधून १.९८० किलो अफीम आढळून आला.अफीमची बाजारात किंमत १.९८ लाख रुपये आहे. हा शाळकरी मुलगा राजस्थानातून सुरतला अफीमची तस्करी करण्यासाठी आला होता. या मुलाबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्या १६ वर्षांच्या शाळकरी मुलाला निओल चेक पोस्ट येथून अटक करण्यात आली.
पोलिस तपासात त्या मुलाने सांगितले कि, गावातील गोपाल शर्मा नावाच्या व्यक्तीने त्याला हा अफीम राजस्थानमधून सुरतला घेऊन जायला सांगितले होते.यासाठी त्याला फक्त ५ रुपये मिळणार होते. पोलीस मुख्य आरोपी गोपाल शर्मा याचा शोध घेत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App