अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे ही घटना घडली असून मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.दरम्यान मेंढपाळातून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.The rains in the eastern part of Junnar hit the shepherds hard; Death of animals, including hundreds of sheep
विशेष प्रतिनिधी
पुणे : अवकाळी पावसामुळे आणि गारठ्यामुळे शेतातील पिकांचे तर नुकसान झालेच पण या पावसाचा माणसांवर आणि जनावरांवर देखील परिणाम झाला आहे.अवकाळी पावसामुळे पुण्यातील जुन्नर पूर्व भागात शेकडो मेंढ्यांसह जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेंढपाळांना याचा फटका बसला आहे.
जुन्नर पूर्व भागातील वडगाव आनंद, आळे, राजुरी, बेल्हे, आणे, साकुरी, बोरी परिसरात विसावा घेतलेल्या मेंढपाळाच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडलेली आहे. यामध्ये १२० मेंढ्या, १३ शेळ्या, १० कोकरे, १ गाय मेलेल्या अवस्थेत आढळली.
अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे ही घटना घडली असून मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.दरम्यान मेंढपाळातून आर्थिक मदतीची मागणी होत आहे.माजी आमदार शरद सोनावणे यांनी वडगाव आनंद येथे विसावा घेतलेल्या मेंढपाळाला भेट दिली. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम तलाठी करत असून मृत झालेल्या मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आर्थिक मदत मिळेल, अशी आशा मेंढपाळांना आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App