मागील काही दिवसांपासून अमृता फडणवीस आणि नवाब मलिक एकमेकांवर वारंवार टीका करत होते.Amrita Fadnavis will never enter politics: Devendra Fadnavis made it clear
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर नेहमी सक्रिय आसतात.अमृता फडणवीस नेहमी राजकीय मुद्द्यावर त्यांचे मत निश्चितपणे मांडू शकतात.त्यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात.
अमृता फडणवीस या सातत्याने राजकीय विषयावर भाष्य करत असतात त्यामुळे त्या भविष्यात राजकारणात प्रवेश करतील का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. परंतु या प्रश्नाचे उत्तर आता खुद्द अमृता फडणवीस यांचा पती देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मागील काही दिवसांपासून अमृता फडणवीस आणि नवाब मलिक एकमेकांवर वारंवार टीका करत होते.यावर फडणवीस म्हणाले की मी राजकारणात कधीही माझी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणारही नाही.तसेच मी बोललेला जपून ठेवा की अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
‘मन ही मन तुझे चाहा…’ अमृता फडणवीस यांचं नवं गाण झालं लॉन्च ; चाहत्यांनी दिला मोठा प्रतिसाद
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वैयक्तिक स्तरावर राजकारण सुरु आहे. राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला हवं. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, त्यांना स्वतःच्या आवडी – निवडी आहेत.पण अमृता फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App