विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही.यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे.The state’s winter session will be held in Mumbai from December 22 to 28
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने दिली आहे. हे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन येत्या २२ ते २८ डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन असून, सोमवारी संसदीय कामकाज समितीची बैठक होणार असून या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं बोललं जातंय.
विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश नाही.यंदाचे हिवाळी अधिवेशन कोरोना पार्श्वभूमीवर होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसंच राज्यातून कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही, हा सगळा विचार करता महाविकास आघाडी सरकारला हे अधिवेशन मुंबईत हवं आहे.
त्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या विधिमंडळ सदस्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यत लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेय. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यासोबत दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. विधिमंडळ परिसरात सभागृह सदस्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जाणार नाही.तसेच दोन्ही डोस घेतल्यानंतरही या अधिवेशनादरम्यान प्रत्येकाला पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करणे अनिवार्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App