
एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. It will be known this morning whether the strike will be called off or not – Sadabhau Khot
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदाभाऊ खोत काय म्हणाले
यावेळी राज्य शासनाच्या पगारवाढीच्या प्रस्तावावर विचार करून संप मिटवावा की सुरूच ठेवावा याबाबत आज निर्णय घेण्यात येईल, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – अनिल परब
दरम्यान आता कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे. तसेच कामावर रूजू होताच त्यांच्यावर सरकारकडून केलेली कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्या कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परबांनी सांगितले.
It will be known this morning whether the strike will be called off or not – Sadabhau Khot
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशात विरोधकांच्या हालचाली वाढल्या, अखिलेश यांनी घेतली विविध नेत्यांची भेट
- काश्मीर खोरे थंडीने गारठले, राजस्थानातही थंडी वाढली
- मोदी विरुद्ध दीदी… काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेने निघालेली सुसाट गाडी…!!
- ममता एकीकडे विचारतात अखिलेशना मदत हवी आहे का? दुसरीकडे अखिलेश यांची आप नेत्यांशी हातमिळवणी!!