विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : नुकताच कोल्हापूरमधील एका व्यापाऱ्याला हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवून 3 कोटी रुपये लुटल्याची घटना घडली आहे. अश्या बऱ्याच घटना पोलिसांसमोर येत आहेत. एका 27 वर्षीय तरुण व्यापाऱ्याला अडीच लाख रूपयांना लुटून सात लोकांनी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या पाच लोकांना अटक केली आहे.
Rising incidence of honeytrap in Kolhapur
कोल्हापूरमधील हा 27 वर्षीय तरुण व्यापाऱ्याची एका अल्पवयीन तरुणीशी ओळख झाली. दोघांनी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केली. भेटण्याचा निर्णय घेतला. भेटल्यानंतर दोघे रंकाळा परिसरातील फ्लॅटवर गेले. तेथे तरुणीने फ्रेश होण्याचा बहाणा करून ती आत गेली. त्यावेळी बेडरूममध्ये पाच जण घुसले. त्यावेळी तरूणी अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. या परिस्थितीमध्ये या पाचही जणांनी त्या तरुणाला ब्लॅकमेल केले. मोबाइलवर व्हिडिओ शूट केले. आणि धमकी दिली. त्यावेळी त्यांच्याकडून दीड लाख रोकड रक्कम आणि दागिने त्यांनी घेतले.
‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून खंडणीची मागणी, तोतया पत्रकारासह चार जणांची टोळी जेरबंद
पोलिसांना यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत सागर माने, सोहेल वाटंगी, उमेश साळुंखे, आकाश माळी,लुकमान सोलापुरे, सौरभ चांदले या गुन्हेगारांना अटक केली. तर हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये सराईत असणारा आणि विविध खून दरोडे मारामारी आदी गुन्हे दाखल असणारा विजय गौडा यावेळी फरार आहे. पोलिस त्याच्या व त्या तरुणीच्या मागावर आहेत.
हनी ट्रॅपच्या या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी नागरिकांना सतर्क केले आहे. कोणत्याही नंबरवरून व्हिडिओ कॉल आला तर कोणत्याही मोहाला बळी न पडता काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App