विशेष प्रतिनिधी
लखनौ – समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचा ८२ वा वाढदिवस उत्तर प्रदेशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.मुलायम पक्षाच्या विक्रमादित्य मार्ग येथील मुख्यालयात पुत्र तसेच पक्षाध्यक्ष अखिलेश यांच्यासह दाखल झाले.Mulayam Singh Yadav cut 83 kg cake
रामगोपाल यादव यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यभरातील कार्यकर्ते या मेळाव्यासाठी आले होते. मुलायम यांनी ८३ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल तेवढ्या वजनाचा केक कापण्यात आला. मुलायम यांनी अखिलेश याच्या साथीत केक कापला.
यावेळी मुलायमसिंह म्हणाले, गरिबातल्या गरीब व्यक्तीचा तसेच तुम्हा सर्वांचाही वाढदिवस साजरा केलात तर मला आनंद होईल. तुम्ही त्यासाठी मला आमंत्रण द्या. मी जरूर येईन. मुलायम यांना वाढदिवसानिमित्त विविध पक्षाच्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App