फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.Fadnavis should see how the city of Amravati can remain calm without adding fuel to the fire; Criticism of Sanjay Raut
विशेष प्रतिनिधी
मुंबई : त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल (रविवारी) अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी फडणवीस यांनी पोलीस आयुक्त व व्यापाऱ्यांचीही भेट घेतली.तसेच फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय.
संजय राऊत म्हणाले, “हे ठाकरे सरकार आहे. इथे कारवाई करताना गट तट पक्ष पहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे.अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाता कामा नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे.”
पुढे राऊत म्हणले की , अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना तसेच अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. दरम्यान आता अमरावती मधील वातावरण सगळं शांत झालं आहे. त्यामुळे कुणी उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करू नये एवढंच मी महाविकास आघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App