केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. वरुण गांधी यांनी पत्रात मागणी केली आहे की, एमएसपी आणि इतर मुद्द्यांवर कायदा करण्याच्या मागणीवर आता तातडीने निर्णय घेण्यात यावा. यासोबतच वरुण गांधी यांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे. काल देशाला संबोधित करताना पीएम मोदींनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. varun gandhi writes to pm Modi, Says Make Law For MSP, take action against mos ajay mishra
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. वरुण गांधी यांनी पत्रात मागणी केली आहे की, एमएसपी आणि इतर मुद्द्यांवर कायदा करण्याच्या मागणीवर आता तातडीने निर्णय घेण्यात यावा. यासोबतच वरुण गांधी यांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करण्याची मागणीही केली आहे. काल देशाला संबोधित करताना पीएम मोदींनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती.
I welcome the announcement of the withdrawal of the 3 #FarmLaws. It is my humble request that the demand for a law on MSP & other issues must also be decided upon immediately, so our farmers can return home after ending their agitation. My letter to the Hon’ble Prime Minister: pic.twitter.com/6eh3C6Kwsz — Varun Gandhi (@varungandhi80) November 20, 2021
I welcome the announcement of the withdrawal of the 3 #FarmLaws. It is my humble request that the demand for a law on MSP & other issues must also be decided upon immediately, so our farmers can return home after ending their agitation.
My letter to the Hon’ble Prime Minister: pic.twitter.com/6eh3C6Kwsz
— Varun Gandhi (@varungandhi80) November 20, 2021
वरुण गांधी यांनी ट्विट केले की, “माझी नम्र विनंती आहे की, MSP आणि इतर मुद्द्यांवर कायदा बनवण्याच्या मागणीवर आता ताबडतोब निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून आंदोलन संपवून शेतकरी बांधव सन्मानपूर्वक घरी परततील. या संदर्भातील माझे आदरणीय पंतप्रधानांना पत्र.
पीलीभीतचे खासदार वरुण गांधी अनेकदा शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करतात, त्यांनी पत्रात आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. हा निर्णय आधी घेतला असता तर 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नसता, असेही ते म्हणाले.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाला लोकशाहीवरील “काळा डाग” असे संबोधून वरुण गांधी नेते म्हणाले की, “या घटनेचा निष्पक्ष तपास आणि न्यायासाठी “यात सहभागी असलेल्या एका केंद्रीय मंत्र्यावरही” कठोर कारवाई झाली पाहिजे. “माझा विश्वास आहे की शेतकर्यांच्या वरील इतर मागण्या पूर्ण करून लखीमपूर खेरीच्या घटनेला न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला तर देशात तुमचा सन्मान आणखी वाढेल. मला आशा आहे की, तुम्ही याबाबतीतही ठोस निर्णय घ्याल.”
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रमोशन आणि सुविधा) कायदा, कृषी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि कृषी सेवा करार कायदा आणि जीवनावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा रद्द करण्याची घोषणा केली होती. यासोबतच एमएसपी प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App