नाशिक : हे दोघेही चुलत बहीण – भाऊ आहेत. दोघेही राजकारणात आहेत पण वेगवेगळ्या पक्षांमध्ये!! पण रक्ताचे नाते जसे तुटत नाही तशीच काही राजकीय नाती देखील तुटत नाहीत. असेच काहीसे आज घडले आहे. या बहिण – भावांनी एकच मागणी केली आहे आणि ती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…!! Priyanka and varun Gandhi pose Same demand to punish ajay mishra keni over lakhimpur violence
प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ज्या अनेक मागण्या केल्या आहेत त्यापैकी एक मागणी आहे, त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा केणी यांच्याबरोबर व्यासपीठावर बसू नये. कारण त्यांच्या मुलावर लखीमपुर इथल्या हिंसाचाराचा आरोप आहे. नेमकी तशीच मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच भाजपच्या एका खासदाराने केली आहे. त्यांचे नाव आहे वरूण गांधी…!! प्रियांका आणि वरूण गांधी ही चुलत भावंडे आहेत. या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. त्यांचे राजकीय मार्ग वेगवेगळे होऊन तीन दशके उलटली आहेत. पण रक्ताचे नाते जसे मिटत नाही तसेच त्यांच्या राजकीय नात्याच्या बाबतीत घडले आहे. वरुण गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा केणी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अर्थात वरुण गांधी यांचा इथून पुढचा राजकीय मार्ग स्वतंत्र आहे. ते कदाचित तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकतात. कारण त्यांना मोदींनी मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांना भाजप कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही. ते काही असले तरी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा केणी यांच्यावरील कारवाईबाबत मात्र प्रियांका आणि वरूण गांधी ही चुलत भावंडे एकसूरात बोलताना आज दिसली आहेत.
कारण वेगवेगळ्या मार्गाने का असेना या चुलत बहिण भावंडांना आपले स्वतःचे राजकीय भवितव्य केंद्रीय मंत्र्याच्या वरच्या कारवाईत असल्याचे वाटत आहे. म्हणून ते एकसूरात बोलले आहेत. हे खरे असले तरी दोन्ही चुलत भावंडे लखीमपूर भोवतीच अडकत आहेत, ही त्यांची राजकीय चूक ठरण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App