राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. Ratnagiri district was once again shaken by the earthquake; Fortunately, no casualties were reported
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.तसेच महिन्याभरातील भूकंपाची ही दुसरी घटना आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख या परिसराला भुकंपाचे धक्के बसले. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.नागरिक गाढ झोपेत असताना हा भूंकप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.भूकंप होत असल्याचे लक्षात येताच नगरिकांनी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. मुंबईपासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.
स्थानिक प्रशासनाकडून भूकंपाच्या घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. एक महिन्याच्या आत रत्नागिरी जिल्ह्याला दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App