विशेष प्रतिनिधी
भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळजवळील हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलावे आणि त्यास दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजपच्या खासदार प्रग्यासिंह ठाकूर यांनी केली आहे.Pradnya singh Thakur demand for renaming Raiway station
या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. विमानतळावर असतात तशा आधुनिक सुविधा तेथे सज्ज करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या सोमवारी या रेल्वे स्थानकाचा लोकार्पण कार्यक्रम होईल.
या पार्श्वभूमीवर प्रग्यासिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनजातीय गौरव दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आदरणीय पंतप्रधानांचे आगमन होणे हा भोपाळसाठी शुभशकून आहे. हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नामांतर करून वाजपेयी यांचे नाव देण्यात आल्याचे ते जाहीर करतील आणि माझी जुनी विनंती पूर्ण करतील अशी मला खात्री आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App