औरंगाबाद जिल्हात रोज १२ हजार पर्यंत लसीकरणाच प्रमाण होतं. आता या निर्णयानंतर २१ ते २४ हजार पर्यंत लसीकरण वाढल्याची माहिती आहे.’Aurangabad pattern’ to be implemented in the state to increase vaccination
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार औरंगाबाद पॅटर्न राबविण्याच्या तयारीत आहे.संपूर्ण राज्यात ज्यांनी लस घेतली नाही त्यांना रेशनिंग दुकान, गॅस एजन्सी आणि इतर सरकारी कार्यालयात प्रवेश न देण्याची शक्यता आहे.औरंगाबाद जिल्हात हा पॅटर्न राबवल्यानंतर लसीकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा जिल्हाधिकारी यांचा दावा आहे.
काय आहे औरंगाबाद पॅटर्न
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील शॉपिंग मॉल, किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसच प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे.
तसेच पेट्रोल पंप, गॅस, रेशन दुकानात खरेदी करायचे असेल तर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केली जाईल. मात्र बिल देताना लसीकरणाचा पहिला डोस प्रमाणपत्र आवश्यक आहे
औरंगाबाद जिल्ह्याच्या लासिकरणात झाली वाढ
औरंगाबाद जिल्हात रोज १२ हजार पर्यंत लसीकरणाच प्रमाण होतं. आता या निर्णयानंतर २१ ते २४ हजार पर्यंत लसीकरण वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यभर हा निर्णय राबविण्याची मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
प्रत्येक जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेतील यावर ही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.नोव्हेंबर अखेरपर्यंत पहिला आणि ख्रिसमस अखेरपर्यंत दुसरा डोस जास्तीत जास्त पूर्ण करण्याच राज्य सरकारचं उद्दीष्ट आहे. हे दोन ही डोस यशस्वी झाल्यानंतर नवीन वर्षात दैनंदिन जनजीवन सुरुळीत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App