विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या वेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वंकष चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गेहलोत यांनी कॉंग्रेस नेतृत्व मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेईल, असे सांगितले.CM Ashok Ghelote meets soniya Gandhi
गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय संघर्ष सुरूच असून या दोन्ही गटात मध्यस्थी घडवून आणण्यासाठी अध्यक्ष सोनिया गांधी या प्रयत्नशील आहेत. त्यांनी गेहलोत यांच्याशी चर्चा केल्यानंतर ५:४ असा फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सहकाऱ्यांना किमान चार आणि गेहलोत यांच्या निकटवर्तीयांना किमान पाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ३० सदस्यीय मंत्रिमंडळात नऊ जागा रिक्त आहेत. हे पद जुलै २०२० पासून पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त आहेत.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिल्लीत काल पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि अजय माकन यांच्याशी चर्चा केली. यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच होण्याची शक्यता आहे. एक व्यक्ती, एक पद या तत्त्वानुसार नियुक्त्या आणि बदल केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App