लाखो युनिट विजेचा वापर करूनही दिवाळीमध्ये अखंडित वीजपुरवठा, गॅसवरून होणारे तंटे मिटले; मोदी है तो सब मुमकिन है!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरात लोकांनी दिवाळी साजरी करताना लाखो युनिट विजेचा वापर रोषणाईसाठी केला आहे. विशेष म्हणजे देशात कोळसा टंचाईचे सावट असताना झालेला विजेचा अफाट वापर आणि अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे हे फळ आहे. त्यामुळे मोदी है तो सब मुमकिन है! याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कारण दीपावलीत एकही दिवस वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. Even using millions of units of electricity in Diwali Uninterrupted power supply, gas disputes resolved; If Modi is, then everything is possible

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून देशात मोठा कायापालट झाला आहे. वीजपुरवठा करण्यासाठी विविध योजना अग्रक्रमावर राबविल्या. कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असताना जलदगतीने रेल्वेच्या वाघिणीतून कोळशाचा पुरवठा केला. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरु राहिल्याचे दिसते. विशेष म्हणजे देशातील नागरिकांनी विजेचा वापर दिवाळीत केला आहे. लाखो युनिट वीज केवळ रोषणाईसाठी वापरली. कोट्यवधी त्यासाठी बल्ब वापरण्यात आले. या शिवाय बाजारात पंख्याचा वापर मोठा झाला. एलईडी मळांचा वापर बाजारात आणि घरात मोठा झाला. विशेष म्हणजे सर्वाधिक विजेचा वापर होण्याच्या काळात वीज अतिरिक्त वापरूनही एकही दिवस वीजपुरवठा खंडित झाला नाही, याचे श्रेय केंद्रातील मोदी सरकारला दिले पाहिजे.



गॅसचा अखंडित पुरवठा

स्वयंपाकाचा गॅस आणि सण यांचे पूर्वी फारच वाकडे असायचे. सण आला की गॅस हमखास मिळत नसायचा. आता नंबर लावला की अल्पदिवसात गॅस दारात येतो. पूर्वीच्या काँग्रेसच्या राजवटीत गॅसला नंबर लावला की तो काही लवकर मिळत नसे किंवा सणा वेळी नेहमीच नागरिकाची अडचण होत असे. त्यावरून डीलर , ग्राहक आणि माध्यमात दिवळीपूर्वी भांडणाचे फटाके फुटायचे.आता तसा त्रास होत नाही. पेटीएमकडून गॅसला नंबर लावला दोन दिवसात गॅस घरी. पूर्वी नंबर लावला की यायला तो वेळ लागत असे. अनेकदा मोकळा सिलिंडर घेऊन डिलरकडे जावे लागत असे. आता जनतेची गॅस सारखी कामे लवकर होत आहे. शिवाय पेटीएमवर आगाऊ रक्कम भरल्यामुळे गॅस घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला अधिकचे दहा रुपये देण्याची गरज नाही. यापूर्वी ते गॅसची रक्कम दिल्यावर अधिकचे दहा रुपये देण्याची मागणी करत असत. हा प्रकार अजूनही सुरु असेल तर नागरिकांनी हाणून पाडला पाहिजे. ऑनलाईन पेमेंट सुविधा आल्यामुळे जनतेचा फायदा होत आहे. याचे श्रेय मोदी सरकारला दिले पाहिजे. मात्र सरकारने सिलेंडरच्या किंमती कमी करून जनतेला आता दिलासा दिला पाहिजे, हे मात्र तितकेच खरे. गॅस सिलेंडरच्या किंमती खरोखरच आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यावर सरकारने नियंत्रण आणण्याची गरज आहे.

Even using millions of units of electricity in Diwali Uninterrupted power supply, gas disputes resolved; If Modi is, then everything is possible

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात