विशेष प्रतिनिधी
जयपूर – राजस्थानातील बारमेर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावर भांडियावास गावाजवळ ट्रक व बसच्या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहनांना लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. इतर २२ जण जखमी झाले.12 people died in road accident
अपघातानंतर घटनास्थळावरून १० मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जोधपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
AHAMADNAGAR FIRE : अहमदनगर दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल ; दुर्घटनेबद्दल व्यक्त केला शोक
अपघातामुळे दोन्ही वाहनांना आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल ट्विटरवरून तीव्र दु:ख व्यक्त केले. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदतही जाहीर केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App