विशेष प्रतिनिधी
पाकिस्तान : अफगाणिस्तानमधील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने ‘ट्रॉइका’ बैठक आयोजित केली आहे. चीन हा देश या बैठकीमध्ये सहभाग घेणार आहे. भारताने आयोजित केलेल्या ‘रिजनल सिक्युरिटी समिट’ मध्ये चीनने वेळापत्रकाचे कारण देत सहभाग घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर 24 तासाच्या आतच त्यांनी ट्रॉइका बैठकीत सहभागी होण्यास होकार कळविला आहे. उद्या म्हणजे गुरूवारी पाकिस्तानमध्ये ही बैठक घेतली जाणार आहे.
China refuses to attend India’s Regional Security Summit, China to attend Troika meeting in Pakistan
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘ट्रॉइका बैठक आयोजित करण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा देईल. अफगाणिस्तानमधील स्थिरता आणि जगामध्ये एकमत निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्नांना आम्ही निश्चितच पाठिंबा देऊ.’
चीनचे अफगाणिस्तानमधील विशेष दूत यू झियायोंग जे अफगाणिस्तानमधील व्यवहारांसाठी नेमण्यात आलेले आहेत ते या बैठकीला चीन देशाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती देखील वांग यांनी यावेळी दिली आहे.
USA Vs China : चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिका त्यांचे रक्षण करणार, जो बायडेन यांची मोठी घोषणा, ड्रॅगनला थेट इशारा
तालिबानी राजवट लागू झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तान हे दोघेही एकमेकांसोबत काम करताना दिसून येत आहेत. या बैठकीत सामील होणाऱ्या चारही देशांचे प्रतिनिधी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुक्ता की यांची भेट घेणार आहेत. मुक्ताकी बुधवारी इस्लामाबादमध्ये पोहोचणार आहेत. इस्लामाबादमधील वृत्तानुसार पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईन युसूफ गुरुवारी ट्रॉय का प्लस या बैठकीचे अध्यक्षस्थान निभावतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App