“मी बिलकुल ठीक”; पैलवान निशा दहिया हिचा इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून खुलासा

वृत्तसंस्था

गोंडा : भारताची ऑलिम्पियन पैलवान निशा दहिया तिची तिच्या भावासह सोनीपत मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी काही वेळापूर्वीच फ्लॅश झाली होती. परंतु ही बातमी खोटी असून आपण सुरक्षित असल्याचा व्हिडिओ निशा दहिया स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.I’m fine”; Wrestler Nisha Dahiya’s revelation by sharing the video on Instagram

मी गोंडामध्ये नॅशनल चॅम्पियनशिपच्या कुस्त्या खेळण्यासाठी आले असून मी सुरक्षित आहे, असे वक्तव्य तिने या व्हिडिओमध्ये केलेले दिसत आहे. भारतीय कुस्ती फेडरेशनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.



त्याआधी पीटीआय या वृत्तसंस्थेने सोनीपत जवळ निशा दहिया आणि तिच्या भावाची काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केल्याची बातमी फ्लॅश केली होती. त्यामुळे हरियाणासह संपूर्ण देशभर क्रीडा विश्वात खळबळ उडाली होती.

निशा दहिया उभरती खेळाडू असून तिच्याकडून मोठी अपेक्षा असताना तिची अशा प्रकारे हत्या व्हावी, याविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत होती. परंतु आता तिने स्वतः समोर येऊन आपण सुरक्षित असल्याचे आणि आपल्या हत्येची बातमी फेक न्यूज असल्याचे स्पष्ट केल्याने या घटनेवर पडदा पडला आहे.

I’m fine”; Wrestler Nisha Dahiya’s revelation by sharing the video on Instagram

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात