पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत जय भीम हा चित्रपट पाहिला. भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा असा हा चित्रपट असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. Jai Bhim of Pune Rural Superintendent of Police Abhinav Deshmukh said that new hope and optimism has increased
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत जय भीम हा चित्रपट पाहिला. भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा असा हा चित्रपट असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
देशमुख यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, आज पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांचे सोबत गुन्हे आढावा बैठकीमध्ये ‘जय भीम’ चित्रपट पाहिला. यामध्ये अतिशय प्रभावीपणे, तामिळनाडूमध्ये 1995 मध्ये झालेल्या एका उच्च न्यायालयातील खटल्याची गोष्ट मांडण्यात आली आहे.
स्वतःच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी सेंगणी, तिची बाजू कोर्टासमोर प्रभावी पणे मांडून तिला न्याय मिळवून देणारे वकील चांद्रू आणि सर्व दबाव झुगारून निपक्षपातीपणे तपास करून सत्य न्यायालयासमोर ठेवणारे पोलीस अधिकारी पेरीमल स्वामी या कथेतील प्रमुख नायक आहेत. पण कथेचा आत्मा बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना, तिने प्रत्येक भारतीयाला, विशेषतः समाजातील दुर्बल, वंचित घटकांना दिलेले मूलभूत अधिकार आहेत. ते अधिकार प्रत्यक्षात अमलात येण्यासाठी, व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची क्षमता आणि प्रेरणा देखील बाबासाहेबांच्या विचाराने नायका मध्ये निर्माण झाली आहे.
पोलीस कोठडी मधील अत्याचार, पोलीस तपासामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापराचा अभाव, गुन्हेगारी जमात हा ब्रिटिश काळातील शिक्का मिटवण्याची आवशक्यता, अजूनही अस्तित्वात असणारी जातीय विषमता असे अनेक विषय हा चित्रपट अतिशय प्रभावीपणे अधोरेखित करतो. अतिशय अंतर्मुख करणारा अनुभव या चित्रपटाने दिला. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा नायक वर्तमानपत्र वाचण्यासाठी हातात घेतो , तेव्हा निरक्षर आणि आदिवासी संगिनी ची सहा वर्षाची पोर देखील त्याच ऐटीत वर्तमानपत्र हातात घेते, तो क्षण भविष्याविषयी नवी आशा आणि उमेद जागवणारा आहे. सर्वांनी पाहावाच असा हा चित्रपट आहे. देशमुख यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे. आपल्यासारखे अधिकारी असतील तर व्यवस्था नक्की बदलेल अशा प्रतिक्रिया येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App