पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. Modi’s appreciation for Hotay; Two hundred letters from Pune thanking the Prime Minister
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना काळात मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर केलेल्या योजनांचा पुरेपूर लाभ भारतीयांना मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर पुण्याच्या गोखलेनगर भागातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानणारी दोनशे पत्र त्यांना पाठवली आहेत. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे.माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पत्रं पोस्टात टाकण्यात आली.
बहुतांश पत्रांमध्ये पंतप्रधान मोदींच्या आत्तापर्यंतच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच मोफत अन्नधान्य वितरण, घरोघरी जाऊन लसीकरण, आणि महिलांच्या नावाने जनधनच्या खात्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल मोदींना या दोनशे पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत. आरोग्य क्षेत्रात आणखी काम करण्याची गरज या पत्रांतून व्यक्त करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App