पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला होता. Demonetisation: 5 years of denomination : Modi government’s objective successful! The proliferation of new notes to digital payments; The only benefits of denomination …
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नोटाबंदी होऊन अनेक ५ लोटली तरी नोटबंदीचे परिणाम अजूनही दिसत आहेत. खरंतर नोटाबंदीचे चांगले-वाईट सर्व परिणाम आता सर्वांनी स्वीकारले आहेत. किंबहुना ते स्वीकारणं सर्वांना भाग होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला होता.
भारताच्या इतिहासात ही पहिल्यांदाच नोटाबंदीची घोषणा तात्काळ आणि गुप्तपणे करण्यात आली होती. नोटाबंदी जाहीर करत नरेंद्र मोदींनी ५०० रुपये आणि १००० रुपयाच्या नोटा चलनात राहणार नसल्याचं जाहीर केलं. संपूर्ण देशाला नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं होतं. मात्र, नोटांबदी जाहीर करताना ज्या हेतूनं करण्यात आली तो हेतू यशस्वी झाला का प्रश्न कायम आहे. कारण, नागरिकांच्या हातात सर्वाधिक रोकड असल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.
नोटा बदलण्यासाठी ५० दिवसांची मुदत
नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करताना ५०० आणि १ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय दिला. नोटाबंदी केल्यानंतर नागरिकांना नोटाबदलून घेण्यासाठी ५० दिवसांची मुदत देण्यात आली होती. नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर देशभरात एटीएमवर, बँकांमध्ये, पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. नोटा बदलून घेण्यासाठी रागेंत उभं राहिलेल्या नागरिकांना जीव देखील गमवावा लागला होता.
इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार ४ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकांकडे १७.९७ लाख कोटी रुपये रोख स्वरुपात होते. आता ८ ऑक्टोबर २०२१ रोजी संपलेल्या पंधरवड्यात ५ वर्षानंतर ते ५७.४८ टक्के म्हणजे १०.३३लाख कोटी रुपयांनी वाढून २८.३०लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलीय. याचा अर्थ ५ वर्षात रोकड कमी झाली नसून वाढली आहे. २५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत लोकांकडे ९.११ लाख कोटी रुपयांची रोकड होती, त्यामध्ये २११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या माध्यमांद्वारे डिजिटल पेमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चे UPI हे देशातील पेमेंटचे प्रमुख माध्यम म्हणून वेगाने उदयास येत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात असलेल्या नोटा रु. १७.७४लाख कोटी होत्या, ज्या २९ ऑक्टोबर २०२१पर्यंत वाढून २९.१७लाख कोटी रुपयांवर गेल्या.
RBI च्या मते, ३० ऑक्टोबर २०२०पर्यंत चलनात असलेल्या नोटांचे मूल्य २६.८८ लाख कोटी रुपये होते. ते २९ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाढून २,२८,९६३कोटी रुपये झाले. त्याच वार्षिक आधारावर, ३० ऑक्टोबर २०२०रोजी त्यात ४,५७,०५९कोटी रुपयांची आणि एका वर्षापूर्वी १ नोव्हेंबर २०१९ रोजी २,८४,४५१ कोटी रुपयांची वाढ झाली.
पुढे, चलनात असलेल्या नोटांचे मूल्य आणि प्रमाण २०२०-२१ मध्ये अनुक्रमे १६.८ टक्के आणि ७.२ टक्क्यांनी वाढले आहे, तर २०१९-२० मध्ये त्यात अनुक्रमे १४.७ टक्के आणि ६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.२०२०-२१ या आर्थिक वर्षात चलनात असलेल्या नोटांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण महामारी होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App