आर्यन खानचे अपहरण; मोहित कंबोज खंडणी वसुलीतला मास्टर माईंड, तर समीर वानखेडे पार्टनर; नवाब मलिकांचे आरोप

वृत्तसंस्था

मुंबई : आर्यन खानने क्रुजचे तिकीट काढलेले नव्हते. अमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाबा या दोघांनी त्याचे तिकीट काढले होते. वास्तविक पाहता ही आर्यन खानच्या अपहरणाची आणि खंडणीची ही केस आहे. मोहित कंबोज मास्टरमाईंड आणि समीर वानखेडे पार्टनर आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. Aryan Khan didn’t purchase the ticket for the cruise party. It was Pratik Gaba and Amir Furniturewala who brought him there. It’s a matter of kidnapping & ransom.

समीर वानखेडे आणि मोहित कंबोज हे दोघे 7 ऑक्टोबरला ओशिवरा कब्रस्तनात भेटले होते. त्यांच्या सुदैवाने तिथला सीसीटीव्ही चालू नव्हता. त्यामुळे त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले नाही. परंतु आमची माहिती ही खात्रीशीर आहे. या घटनेनंतर समीर वानखेडेने कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार पोलीसमध्ये दाखल केली. कारण त्याला आपले बिंग फुटण्याची भीती वाटत होती. समीर वानखेडे आणि रोहित कंबोज हेच खरे आर्यन खानच्या अपहरणातले मास्टरमाईंड आहेत. तेच खंडणी वसुली करतात, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख, नवाब मालिकांपर्यंत अनेकांवर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याच बरोबर दाऊदची त्यांचे नेमके काय संबंध आहेत? दाऊदचा माणूस आणि ड्रग्ज पेडलर चिंकू पठाण सह्याद्री अतिथीगृहावर अनिल देशमुख यांची कशी काय भेट घेऊ शकतो? अशी तोफ डागली होती. त्यावर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून समीर वानखेडे आणि मोहित कंबोज यांच्यावर तोफ डागली आहे.

Aryan Khan didn’t purchase the ticket for the cruise party. It was Pratik Gaba and Amir Furniturewala who brought him there. It’s a matter of kidnapping & ransom.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात