पण झेंडू उत्पादकांची दिवाळी कडूच ; दर निम्याने घटले

यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दिवाळीसाठी फुले राखून ठेवली होती. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत आहे. त्यामुळे दर घटले आहेत.but the Diwali of marigold growers is bitter; Rates dropped by half


विशेष प्रतिनिधी

पुणे : लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी बाजारात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत फुलांचे दर निम्याने घटले आहेत. त्यामुळे झेंडू उत्पादकांना मोठा फटका बसला आहे.आत्ता थेट मार्केटला मोठ्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांना बुधवारी २० ते ५० रुपये, तर छोट्या आकाराच्या फुलांना १० ते २० रुपये किलो भाव मिळाला.

किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीच्या झेंडूच्या फुलांची ५० ते ८० रुपये किलोने विक्री केली जात आहे.तसेच शेवंतीच्या फुलांना २० ते ४५ रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची दुप्पट आवक आहे, तर ५० टक्क्यांनी दरात घट झाली आहे.



फुले सध्याचे भाव मागील वर्षीचे भाव

१)मोठा झेंडू सध्याचा भाव मागील वर्षीचे भाव
२० ते ५० रुपये १०० ते १२० रुपये

२)छोटा झेंडू १० ते २० रुपये. ४० ते ७० रुपये

३) शेवंती १० ते ४५ रुपये. २५० ते ३०० रुपये

पुणे, सातारा, सोलापूर, बीड, तसेच कर्नाटकातूनही झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे .तर शेवंतीची यवत, माळशिरस येथून आवक होत आहे. फुलांना शहरासह, उपनगर भागातून मागणी असते.मागील वर्षी लॉकडाउनमुळे मंदिरे व धार्मिक स्थळेही बंद होते.

त्यामुळे फुलांची आवकही मर्यादित होती. दरम्यान यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दिवाळीसाठी फुले राखून ठेवली होती. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत आहे. त्यामुळे दर घटले आहेत. आवक अशीच राहिल्यास दरही टिकून राहतील, असे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

but the Diwali of marigold growers is bitter; Rates dropped by half

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात