आयसीसी T20 विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघ प्रबळ दावेदार मानला जात होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभव केला. Shoaib akhtar says indian cricket divided in two groups t20 world cup 2021
वृत्तसंस्था
मुंबई : आयसीसी T20 विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघ प्रबळ दावेदार मानला जात होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पहिल्या सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने पराभूत केले होते, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभव केला.
पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून विजय मिळवत विश्वचषकात पहिला विजय नोंदवला. त्यानंतर भारताचा न्यूझीलंडकडून आठ गडी राखून पराभव झाला. संघाची ही कामगिरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही समावेश आहे. अख्तरने टीम इंडियाच्या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने असेही म्हटले आहे की, टीम इंडिया दोन गटांत विभागलेली आहे.
अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला असे का वाटते की संघात दोन गट आहेत? यातील एक विराट कोहलीविरुद्ध, तर दुसरा विराट कोहलीसोबत आहे. ते स्पष्टपणे दिसत आहे. संघ विभागलेला दिसतो. हे का होत आहे हे मला माहीत नाही. कारण कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक असू शकतो. त्याने चुकीचा निर्णय घेतला असेल, जो योग्य आहे पण तो एक महान क्रिकेटर आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
अख्तरने न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “होय, टीका आवश्यक आहे, कारण ते न्यूझीलंडविरुद्ध खराब क्रिकेट खेळले आणि त्याचा दृष्टिकोन चुकीचा होता. नाणेफेक हरल्यानंतर सर्वांचीच डोकी झुकली होती. असं का होतंय याची त्याला कल्पना नव्हती. इंडिया, तोपर्यंत तुम्ही फक्त नाणेफेक गमावली होती, संपूर्ण सामना नाही. तो फक्त तिथे खेळत होता आणि त्याच्याकडे गेमप्लॅन नव्हता.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App