महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला विजय, आदित्य ठाकरे म्हणाले- नव्या विकास पर्वाची नांदी, दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल!

दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. शिवसेनेने ही जागा जिंकली आहे. शिवसेनेचा विजय खास आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने जिंकलेली ही पहिलीच जागा आहे. या विजयानंतर शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. Dadra And Nagar Haveli Bypoll, Aditya Thackeray on Shiv Sena Victory says we will raise the voice of the people


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. शिवसेनेने ही जागा जिंकली आहे. शिवसेनेचा विजय खास आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेने जिंकलेली ही पहिलीच जागा आहे. या विजयानंतर शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे.

विजयानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांचे वक्तव्य आले. ते म्हणाले की, राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने आमचे हे पहिले पाऊल आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच शिवसेनेचा विजय झाला आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा अशी परिस्थिती राहणार नाही, आम्ही सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू.

ही फक्त सुरुवात

या निकालांवर संजय राऊत खूप खुश दिसत होते. ते म्हणाले की, दादर नगर हवेलीत जे निकाल लागले आहेत, ती केवळ सुरुवात आहे. आता आगामी काळात दमण आणि दक्षिण गुजरातमध्येही शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. संजय राऊत यांनी 2022 मध्ये होणाऱ्या यूपी निवडणुकीची रणनीतीही सांगितली आहे. राऊत म्हणाले की, पक्ष यूपी निवडणुकीतही उतरणार आहे.

डेलकर यांना पतीच्या निधनानंतर मिळाले तिकीट

दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. त्यांचे पती मोहन डेलकर यांचा यावर्षी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. भाजप नेते आणि दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे त्यांचा छळ करत असल्याची माहिती समोर आली आहे.

आदित्य ठाकरे यांचे ट्वीट

दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे.

Dadra And Nagar Haveli Bypoll, Aditya Thackeray on Shiv Sena Victory says we will raise the voice of the people

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात