एनसीबी कार्यालयाबाहेरच शिवप्रतिष्ठान युवाकडून समीर वानखेडेंचा सत्कार

वानखेडेंच्या समर्थनार्थ ‘समीर वानखेडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देत समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी केली.Sameer Wankhede felicitated by Shiv Pratishthan Youth outside NCB office


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वारंवार गंभीर आरोप करत आहेत.यावेळी सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या प्रकरणात आता श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने प्रवेश केला आहे.

दरम्यान एनसीबीच्या कार्यालयाबाहेर आज समीर वानखेडेंना शिवप्रतिष्ठान युवाकडून समर्थन दिले आहे. कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला. तसेच वानखेडेंच्या समर्थनार्थ ‘समीर वानखेडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देत समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी केली.



 

एनसीबीच्या कार्यालयाबाहेर शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आज गर्दी केली होती. समीर वानखेडेंना समर्थन देण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र जमले होते. यावेळी समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की , ‘आमची वानखेडेंकडे मागणी आहे की तुम्ही कुठल्याही आरोपांकडे लक्ष न देता कारवाई करत राहा. तुम्ही जी कारवाई केली आहे ती अगदी योग्य आहे.

पुढे कार्यकर्ते म्हणाले की , ड्रग्जच्या रॅकेटचा तुम्ही पर्दाफाश करा. आमच्या संघटनेतर्फे आम्ही पूर्ण राज्यभरातून त्यांना समर्थन देत आहोत.आर्यन शाहरुख खानला वाचवण्यासाठी समीर वानखेडेंवर रोज नवनवे आरोप करणाऱ्या नवाब मलिकांचा आम्ही निषेध करत आहोत आणि देशातला, राज्यातला युवक वानखेडेंसोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत’.

Sameer Wankhede felicitated by Shiv Pratishthan Youth outside NCB office

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात