प्रतिनिधी
देगलूर: देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात विजय काँग्रेस पक्षाने मिळवला आहे. पण उड्या मारत मात्र महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मारताना दिसत आहेत.काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली.Victory of Congress in Deglaur; Leaders of Udya Mahavikas Aghadi
काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. त्यांनी आपले मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर यांना आई निवडणुकीत भाजपमधून सोडून काँग्रेसमध्ये परत आले.
ते स्वतः देगलूर बिलोली मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार आणि राज्यात मंत्री होते. त्यांचा प्रभाव देगलूर बिलोली मतदार संघाच्या मतदानावर पडला. एकूण काँग्रेसचे आणि विशेषत: अशोक चव्हाण यांचे यश आहे पण उड्या मात्र महाविकास आघाडीचे नेते मारताना दिसत आहेत. प्रत्यक्षात महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी देगलूरच्या निवडणुकीत फारसे लक्ष घातले होते असे दिसले नाही.
भाजपने शिवसेनेचे नेते सुभाष साबळे यांना पक्षातून पडून उमेदवारी देऊन निवडणूक लढविली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेक दिग्गज नेते सुभाष साबणे यांच्या प्रचाराला आले होते.
परंतु रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट हे नेते थोपवू शकले नाहीत. शिवाय अशोक चव्हाण यांनी नियोजनपूर्वक ही निवडणूक लढविली. या निमित्ताने काँग्रेस आमदारांची विधानसभेतली संख्या जशीच्या तशी राहिली.
पण या निकालामुळे महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे, असा दावा महा विकास आघाडीतील घटक पक्षांनी केला आहे. प्रत्यक्षात हा विजय काँग्रेसचा आहे पण उड्या मात्र महाविकास आघाडीचे नेते मारताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App