विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या यूपीए चेअरमनपदाची चर्चा काल दिवसभर घडवून सायंकाळी माघार घेण्यात आली. तरी काँग्रेसच्या कमजोर नेतृत्वावर या निमित्ताने बोट ठेवले गेले. नेमके तेच पवारांना हवे होते का? त्यावर आज प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला टोचून घेतले. या दोन्ही नेत्यांची दिशा आणि राजकीय कृती काँग्रेसला त्या टोकापर्यंत खेचत नेण्याची आहे का? की काँग्रेसने राज्यातल्या ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. sharad pawar sanjay raut targets
काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला तर दोन राजकीय बाबी स्पष्ट होतील, एक ठाकरे सरकार पाडल्याचे पाप शरद पवारांच्या नावावर जमा होणार नाही. म्हणजे पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह नेहमी उभे राहते, ते उभे राहणार नाही. कदाचित राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस पवारांना तो शिक्का पुसायचा असावा. आणि दुसरे ठाकरे सरकार पडले की नवा सौदा करायला पवार मोकळे होतील किंवा नव्याने निवडणुकीकडे महाराष्ट्राला ढकलून राष्ट्रवादीची पोझिशन सुधारता येईल. म्हणजे निदान तसा प्रयत्न करता येईल.
गेल्या काही महिन्यांमधल्या पवारांच्या हालचाली बघितल्या तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीची फेरबांधणी करण्याचा त्यांचा जोरदार प्रयत्न दिसतो आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. भाजपचा पराभव झाला असला तरी महाआघाडीतील घटक पक्षांमध्ये नुकसानीत शिवसेना गेली आहे. शिवसेनेचा एकमेव उमेदवार पडला आहे.
राष्ट्रवादीला लाभ झाला आहे. राष्ट्रवादीची अशीच वाटचाल राहिली तर भाजपशी टक्कर घ्यायचा भास निर्माण करून शिवसेना आणि काँग्रेसला कमजोर करण्याचा डावही पवारांना साधून घेता येईल.
sharad pawar sanjay raut targets
पवारांची वाटचाल तशीच चालली आहे का? आणि संजय राऊत जरी शिवसेनेत असले तरी पवारांना ते शिवसेना आणि काँग्रेस यांना कमजोर करण्यात साथ देत आहेत का? या शंका बळकट होण्याइतपत दोन्ही नेत्यांच्या हालचाली ठळक दिसत आहेत. दिवसेंदिवस त्या अधिक ठळक होण्याची शक्यता आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App