वृत्तसंस्था
यादगीर : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे नव्हे तर काँग्रेस पक्षाचे आंदोलन सूरु आहे,अशी टीका कर्नाटकचे पशुपालन मंत्री प्रभू चौहान यांनी केली. पंजाब, हरयाणातील शेतकरी नवीन तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. Karnataka minister takes on Congress
ते म्हणाले, असे आंदोलन शेतकरी कधीच करत नाहीत. शेतकरी नेहमी शेतात काम करतो. आंदोलन करणारे शेतकरी नसून काँग्रेसचे कर्यकर्तेच आहेत. नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्याचे भले करी इच्छित असताना काँग्रेसची मंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. Karnataka minister takes on Congress
गोहत्या बंदी कायद्याला काँग्रेसचा विरोध
औराडचे आमदार असलेले चौहान म्हणाले, रस्त्यावर गोंधळ घालण्याची काँग्रेसची परंपरा आणि संस्कृती आहे. विधानसभेचे असाच राडा त्यांनी नुकताच घातला. राज्यात गोहत्या बंदीचा कायदा आम्ही आणत असताना काँग्रेस त्यात रोडे घालत आहे. काँग्रेस आमदारांनी कायद्याला विरोध करून मंगळवारी कामकाजही बंद पाडले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App