आणखी एक चिंता मिटली; बँकांच्या हफ्त्यांना 3 महिने ब्रेक आणि कर्जेही स्वस्त


विशेष  प्रतिनिधी

मुंबई : कोरोना संकटाचा भारतीय अर्थ व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक क्षेत्रांना याचा फटका बसल्याने जागिक मंदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतालाही विकास दराचे ठरविलेली लक्ष्य गाठणे कठीण आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. देशात जास्तीत निधी उपलब्ध व्हावा. बँकामध्ये नगद रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने अनेक सवलती, दर बदल करण्याची घोषणा केली. रेपो दरात .७५ अंशांची आणि रिव्हर्स रेपो दरात .९० अंशांची घट करून कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे तसेच त्याच्या वसूलीवरही तात्पुरता प्रतिबंध घालण्यात आला आहे. कँश रिझर्व रेशो (सीआरआर) घटवून ३ % करण्यात आल्याने १ लाख ३७ हजार कोटींची नगद रोख रक्कम बाजारात उपलब्ध होईल. ही महत्त्वाची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली. परंतु, आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटल्याचा भारतीय अर्थ व्यवस्थेस फायदा होईल.

रिव्हर्स रेपो दरातही ९० अंशाची घट करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना पैशाची, नगद रकमेची कमतरता पडू नये, यास सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. कर्जावरील इएमआयच्या वसूलीसाठी तीन महिन्यांचा प्रतिबंध जाहीर केला आहे. याचा सामान्य कर्जदारांना दिलासा मिळेल, असेही शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. बँकांमध्ये रोख रक्कम पुरेशी उपलब्ध करण्यात येत आहे. काळजीचे कारण नाही. लोकांनी एटीएममधून अनावश्यक रक्कम काढून ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय