भारतात कोरोनाची हजारी पार; महाराष्ट्र २०० च्या दिशेने; परिस्थिती चिंताजनक


विशेष  प्रतिनिधी

कोविड १९ ट्रँकरवरून : कोरोना व्हायरसच्या फैलावाची परिस्थिती चिंताजनक झाviली असून भारताने एक हजाराचा आकडा ओलांडला आहे. आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १०२९ झाली आहे, तर महाराष्ट्रात हा आकडा १८६ वर पोचला आहे. देशातील १०२९ पैकी ९२० जणांवर उपचार सुरू असून ८५ जण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा २४ आहे. महाराष्ट्रात १८६ पैकी १५५ वर जणांवर उपचार सुरू असून २५ जण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा ६ आहे. महाराष्ट्राखालोखाल केरळचा नंबर आहे. तेथे कोरोना बाधितांची संख्या १८२ वर पोचली आहे.

राज्यात 186 कोरोनाबाधित

राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 186 वर पोहोचली आहे…
मुंबई – 73

पुणे – 23

पिंपरी-चिंचवड – 12

सांगली – 24

नागपूर – 11

कल्य़ाण-डोंबिवली – 7

नवीमुंबई – 6

ठाणे – 5

यवतमाळ – 4

अहमदनगर – 3

पनवेल – 2

सातारा – 2

उल्हासनगर – 1

वसई-विरार – 1

पालघऱ – 1

सिंधुदुर्ग – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

कोल्हापूर – 1

गोंदिया – 1

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण