काँग्रेसची खुमखुमी अजून जिरलेली नाही…!! सहा महिन्यांत कमलनाथच मुख्यमंत्री होणार : मध्य प्रदेश काँग्रेसचे ट्विट

 विशेष प्रतिनिधी 

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा शक्तिपरीक्षेआधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, तरी काँग्रेसची खुमखुमी अजून जिरली नसल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य प्रदेश काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले आहे, १५ ऑगस्ट २०२० रोजी कमलनाथच मुख्यमंत्री म्हणून ध्वजारोहण करतील. सध्याची विश्रांती अल्पकाळासाठी आहे. नेमक्या याच ट्विटवरून काँग्रेसची परंपरागत सत्तेची मस्ती दिसते.                                             एकतर स्वत: मेहनत घेऊन कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात सत्ता आणली नाही. मेहनत केली, ज्योतिरादित्य शिंदे यांनी…!! सत्तेच्या खुर्चीवर बसले कमलनाथ. त्यांना आशीर्वाद काँग्रेस हायकमांडचा. “मेहनत करे मुर्गा अंडा खाए फकीर”, असा हा प्रकार आहे. बरं, ज्योतिरादित्य यांच्या बंडानंतर कमलनाथांची सत्ता गेली. कोणत्याही परिपक्व, प्रगल्भ राजकारण्यासाठी ही शांत बसण्याची वेळ…!! पण नाही, कमलनाथ आणि त्यांच्या समर्थकांची मस्ती अजून जिरलेली नाही.

त्यांचे उद्योग थांबलेले नाहीत, हेच या ट्विटवरून दिसते. मध्य प्रदेश काँग्रेस अशा दिवाळखोर नेत्यांच्या ताब्यात असल्यामुळे असे ट्विट सत्ता गेल्यानंतरही आले. कमलनाथ समर्थक मंत्र्याने त्याचे समर्थनही केले. त्यासाठी त्याने कमलनाथ – शिवराजसिंह चौहान यांच्या ताज्या भेटीचा हवालाही दिला. कमलनाथ यांनी राजीनामा दिला. पण जणू सत्ता गेलीच नाही, अशी ही वर्तणूक आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात