विधिमंडळ अधिवेशनात बाहेर राहून पडळकर मॅन ऑफ द मॅच

  • धनगर आंदोलनासाठी फलकांचे आंदोलन गाजवले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासकट मंत्र्यांच्या बंगल्यावरील कोट्यवधींचा खर्च, त्यांच्याच बंगल्यांना डिफॉल्टर जाहीर करेपर्यंत थकलेली पाणीपट्टी हे दोन विषय तर विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या सुरवातीला तर गाजलेच, पण आजचे मॅन ऑफ द मॅच ठरले, गोपीचंद पडळकर. त्यांनी धनगर आरक्षणासाठी सभागृहाबाहेर अनोखे फलकांचे आंदोलन करून पहिला दिवस गाजवला. gopichand padalkar gets much attention for dhangar reservation

 

मुंबईत सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, तसेच अधिवेशनाच्या अल्प कालावधीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच अधिवेशनाच्या कामकाज सुरु होतात, फक्त दोन दिवसांचेच अधिवेशन का असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या घोषणांची पूर्तता कधी होणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. तसंच आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी बॅनर घालून सभागृहात हजेरी लावली. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते गोपीचंद पडळकरांनी. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष वेधताना पडळकरांनी पारंपरिक वेशभूषेत हटके आंदोलन केले. पडळकर ढोल बडवत विधानभवन परिसरात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पडळकरांची त्यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी पडळकर मागण्यांचा एक भलामोठा फलक घेऊन आले होते.

 

पडळकरांना पोलिसांनी आडवल्याचे पाहताच पडळकरांच्या समर्थनासाठी रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, भाजपचे प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे नेते धावून आले. तेथे पडळकरांनी घोषणा देत ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे काढले. हे नाट्य संपत नाही तोच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी हुतात्मा चौक इथे जाऊन केंद्रीय कृषी कायद्याला दुग्घाभिषेक घातला. त्यानंतर सदाभाऊ घोत आणि पडळकर ही जोडी विधानभवनात जाण्यासाठी परतली.

gopichand padalkar gets much attention for dhangar reservation

मात्र त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखण्यात आल्याचा दावा करत त्या दोघांनी तिथेच ठिय्या मांडला. काही वेळांनी त्या दोघांना विधानभवन परिसरात प्रवेश देण्यात आला. पण तोपर्यंत आतल्या पेक्षा बाहेरच या दोन्ही आमदारांच्या बातम्या गाजल्या. ठाकरे – पवार सरकारने मांडलेल्या विधेयकांकडे सरकारी कामकाज म्हणून औपचारिक रिपोर्टिंग झाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*